केंद्र सरकारची मोठी घोषणा : गरजूंना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात मिळणार तांदूळ

blank

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, हातावरचे पोट असणाऱ्यांनी अशा वेळी काय करावे, हे लोक पोट कसं भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा गरिब, होतकरु कुटुंबांसाठी सरकारने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, “केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबाबत केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारला तीन महिन्यांचा अॅडवान्स सामान खरेदी करण्याची सूचना दिली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे, कंत्राटी कामगारांनाही संपूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी जनतेला काळजी घेण्याचंदेखील आवाहन केलं. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी सरकारने देशातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा सरकारने दिली आहे. याशिवाय सर्व जीवनाश्यक सेवा सुरु असून किराणा, रेशनचे दुकान सुरु असणार आहेत”, अशी ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.