मद्यप्रेमींसाठी मोठा निर्णय : आता घरबसल्या मागवता येणार आपल्या आवडीचे मद्य

wine

पुणे : राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकार तसेच स्थानिक प्रशासन या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे, पण तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. त्यामुळे सरकारने आता विकेंड लॉकडाऊन घोषित केले आहे.

तसेच पुण्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी येत्या तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक टाळेबंदी असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे.

सध्या राज्यामध्ये ई- कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ २४ मागविता येणार आहेत. मद्य विक्री दुकानांना त्यांच्या अ‍ॅपद्वारे तसेच घरपोच सुविधेद्वारे सेवा देत येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सेवा देता येईल. नियमानुसार मद्य विक्री ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून देता येणार नाही. घरपोच मद्य सेवा देण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मागील वर्षी सरकारने अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक दिवस देशभरातील सर्व मद्य विक्री बंद होती त्यामुळे सरकारला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली होती. मे महिन्यात परत दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. परंतु त्यानंतर नागरिकांनी दुकानांसमोर भल्या मोठ्या रांगा लावत मद्याची खरेदी केली होती. त्यामुळे यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र यात आता मद्य विक्रेत्यांची कसरत होणार असून त्यांना घरपोच मद्यविक्रीसाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

बार आणि वाईन्स शॉपला घरपोच सेवा देता येणार आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा त्यांना स्वतःलाच उभारावी लागेल. शिवाय त्यासाठी केवळ त्यांच्याच कामगारांची नेमणूक करावी लागेल. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा उपयोग त्यांना करता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या