अ‍ॅमेझॉन कंपनीला मोठा धक्का, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुपच्या डीलला ‘सीसीआय’ची मंजुरी

अ_ॅमेझॉन

नवी दिल्ली : प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला आता मोठा झटकाबसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील कराराला मंजुरी दिली गेली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनी या कराराला विरोध करीत असून सिंगापूर लवादाच्या कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.

अखेर सीसीआयने शुक्रवारी ट्विट करून सांगितले की, फ्युचर ग्रुपच्या रिटेल, घाऊक आणि लॉजिस्टिक व्यवसायाला रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाईल लिमिटेडद्वारे अधिग्रहण करणाऱ्या या कराराला मंजुरी दिली आहे. सीसीआय बाजारातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि स्पर्धा ठेवण्यासाठी नियामक म्हणून काम करते.

फ्युचर -रिलायन्स कराराविरूद्ध अ‍ॅमेझॉन कायदेशीर लढाई लढत आहे. फ्युचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील प्रकरण दिल्ली हाय कोर्टातही विचाराधीन आहे. शुक्रवारी देखील दिल्ली हाय कोर्टाने फ्युचर ग्रुपच्या करारामध्ये अ‍ॅमेझॉनचा हस्तक्षेप करण्याच्या स्थगितीच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला. त्यावर आता संबंधित पक्षांना आपला लेखी प्रतिक्रिया सादर करण्यासाठी कोर्टाने 23 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या