मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल

टीम महाराष्ट्र देशा : मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मनसेच्या नविन झेंड्याचे अनावरण राज ठाकरेंच्या हस्ते झाले. झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरण्यात आली आहे. यामुळे आता हा मुद्दा वादग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे विरोधात संभाजी ब्रिगेडने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली. आज मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी शिवमुद्रा असलेल्या झेंड्याचे अनावरण केले. त्यामुळे राजमुद्रे’चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही. असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Loading...

याच झेंड्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने भूमिका घेतली असून मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील खटला दाखल करणार असल्याची चर्चा आहे.मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवरायांची ‘राजमुद्रा’ वापरण्यात आली आहे. या झेंड्यावर समाज माध्यमांतून काय प्रतिक्रिया येतात ते आता पाहावे लागेल. याअगोदर मात्र मराठा क्रांती मोर्चाने या झेंड्याबाबत आक्षेप नोंदवला होता. तरीही मनेसेने आपल्या नव्या झेंड्यावर राजमुद्राच ठेवली आहे. त्यामुळे मनसे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मनसेने राजमुद्रेचा वापर टाळावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा उच्च न्यालायत जाणार असून, या प्रकरणी खटला दाखल करणार असल्याचे मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण