दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम

कार्तिक

मुंबई : धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेअतर्गत साकारल्या जाणाऱ्या ‘दोस्ताना 2 या चित्रपटातून कार्तिक आर्यनची एक्झिट झाल्याची अधिकृत माहिती दिली होती. यामागे दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेला वाद हे कारण सांगण्यात येत आले होते.

कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. असे धर्मा प्रोडक्शन, कडून सांगण्यात आले होते.

दोस्ताना नंतर आता कार्तिकच्या हातात आणखी एक नवा चित्रपट आला आहे. कार्तिक एका प्रेमकथेवर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. ‘पिंकविला’ ने दिलेल्या वृत्तानुसार साजिद नादियावाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर कार्तिक पहिल्यांदाच साजिद सोबत काम करणार आहे. एक लव्हस्टोरी बेस हा चित्रपट असणार आहे.

राष्ट्रिय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस या चित्रपटांच दिग्दर्शन करणार असल्याचं समोर येत आहे. या चित्रपटातून समीर हे बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहेत. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP