शिवानी सुर्वेचं बिग बॉस मराठीची विजेती ठरावी; शिवानीच्या मालिकांमधल्या नायकांची इच्छा 

टीम महाराष्ट्र देशा : बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यावर आले असताना अभिनेत्री शिवानी सुर्वेचं जिंकावी अशी शिवानीच्या सहकलाकारांची इच्छा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने नुकताच एका व्हिडीयोव्दारे आपल्या आगामी सिनेमाची नायिका शिवानी सुर्वेला जिंकण्यासाठी ट्रिपल शुभेच्छा दिल्या होत्या. आता तिच्या हिंदी आणि मराठीतल्या सुपरडुपर हिट ठरलेल्या मालिकांच्या हिरोज् नी सुध्दा शिवानीच बिग बॉस मराठीची विजेती बनावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

शिवानी सुर्वेच्या ‘देवयानी’ मालिकेतला सहकलाकार आणि मित्र संग्राम साळवी, ‘जाना ना दिलसे दूर’ आणि ‘एक दिवाना था’ या हिंदी मालिकेतला सहकलाकार आणि मित्र विक्रम सिंग चौहान ह्या दोघांनीही शिवानीला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रभर गाजलेल्या ‘देवयानी’ मालिकेची शिवानी सुर्वे नायिका होती. ह्या मालिकेतला तिचा नायक अभिनेता संग्राम साळवीने सोशल मीडियावर खास संदेश दिला आहे. तो म्हणतो, “टॉप ६ सदस्यांपैकी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी शिवानी अधिक पात्र स्पर्धक वाटते. ती बिग बॉस सीजन २ जिंकू शकेल असे मला वाटते.” संग्रामने आपल्या चाहत्यांना शिवानीसाठी भरपूर वोट करा असे आवाहन केले आहे. तो म्हणतो, “तिला इतके वोट्स करा कि ती बिग बॉस सीजन दोन जिंकलीच पाहिजे.”

मराठी मालिकांच्या जगतात अधिराज्य गाजवल्यावर शिवानी हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय झाली. हिंदीतली ‘जाना ना दिलसे दूर’ या मालिकेत तिने ‘विविधा कश्यप’ची भूमिका साकारली होती. विविधा आणि अथर्व म्हणजेच शिवानी आणि विक्रम सिंग चौहान यांची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली. विक्रम सिंग आणि शिवानी मालिकेनंतरही देखील छान मित्र आहेत. विक्रम सिंग चौहान म्हणतो, ”शिवानी सुर्वे खूप छान खेळत आहे. मला मराठी फारसं समजत नाही तरी ही मी शिवानीसाठी बिग बॉस मराठी २ चे काही एपिसोडस बघितले. माझी खूप इच्छा आहे की शिवानी सुर्वे हिच बिग बॉस २ ची विनर व्हावी.”

‘जाना ना दिलसे दूर’ नंतर शिवानी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर लोकप्रिय झाली. सध्या तिची हि मालिका इंडोनेशियामध्ये ‘सालेमानाचिंता’ नावाने दाखवली जात आहे. त्यामुळे शिवानीची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. शिवानीला सध्या हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा प्रचंड पाठींबा मिळत आहे.