Uddhav Thackeray vs Eknath Shinde मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर जवळपास महिनाभर शिवसेनेचे अनेक खासदारही पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. आज (मंगळवार) लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदार स्वतंत्र गट तयार करण्याची शक्यता आहे. या संदर्भात खासदार सभापतींना औपचारिक पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि बंडखोर गटनेते एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदरांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम शिंदे यांनी सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या व्हर्च्युअल बैठकीत सुमारे १२ शिवसेना खासदारांनी भाग घेतला होता. या बैठकीत लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सीएम शिंदे आणि खासदारांची बैठक होणार असून त्यानंतर मंगळवारी दुपारी दिल्लीत यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल. शिवसेनेचे तीन खासदार, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ईडीच्या चौकशीत असलेल्या भावना गवळी, ज्यांना या महिन्याच्या सुरुवातीला शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या मुख्य व्हिप पदावरून हटवण्यात आले आणि पुण्याचे खासदार संजय मंडलिक यांचा कल आधीच शिंदे गटाकडे आहे.
दरम्यान, १२ खासदारांचा वेगळा गट स्थापन केल्याचा दावा फेटाळून लावत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्ष लोकसभेत एकसंध असून, वेगळ्या गटाची कोणी भेट घेतल्यास कारवाई केली जाईल.”
एकनाथ शिंदेंचा मोठा दावा-
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. “शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत १२ नाही तर एकूण १८ खासदार आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका मानला जात आहे.
यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपच्या सहाय्याने सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेनी स्थानिक पातळीवर देखील शिवसेना पक्ष कमकुवत केला आहे. पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. दरम्यान आता खासदार ताब्यात घेतल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची केली स्थापना-
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटात सामील झाल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत या आमदारांवरील कारवाईला स्थगिती दिली होती. आता यावर सुनावणी होण्यापूर्वीच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS to Uddhav Thackeray | “बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी…” ; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला
- Eknath Shinde | शिवसेना हायजॅक? “आमच्यासोबत १२ खासदार नाही तर एकूण…” ; एकनाथ शिंदेंचा दावा
- IND vs ENG : इंग्लंडविरुध्द मालिका विजयामुळे टीम इंडियाच्या ODI रेटिंगमध्ये सुधारणा; वाचा!
- Rishabh Pant : ऋषभ पंतने शॉट खेळण्यासाठी योग्य गोलंदाज निवडले; भारताच्या माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य
- Ben Stokes : ‘या’ कारणामुळे घेतली बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला,‘मी माझे शंभर टक्के…’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<