जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का

कसोटी चॅम्पियनशी

इंग्लंड : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

मात्र, सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आधीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत.  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फिरकीपटू मिचेल सेंटनर यांना दुखापत झाल्याने न्यूझीलंडच्या संघात चिंतेचे वातावरण निर्माण झले आहे.

केन विल्यमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताचा कोपर दुखावला होता. विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबचा निर्णय हा सामन्याच्या आधी घेतला जाईल. तर मिचेल सेंटनर हा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही अशी माहिती न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP