Share

NCP vs BJP | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!, राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

NCP vs BJP | जामखेड : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का मिळाला आहे. जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

चोंडी येथे राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. राजुरी, डोळेवाडी,एकबुर्जीवस्ती , घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका मानल्या जात आहे.

जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपच्या हातातून सत्ता काबीज केली होती. कधीकाळी जामखेड भाजपचा गड होता. रोहित पवारांनी मोठ्या मताधिक्याने तो गड जिंकला. आता पुन्हा एकदा २०२४ च्या दृष्टीकोणातून भाजपने जामखेडमध्ये तयारी सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

NCP vs BJP | जामखेड : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का मिळाला आहे. जामखेडमध्ये राष्ट्रवादी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics