उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद यांचा भाजपत प्रवेश

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. राजीव सातव यांचे आकस्मिक निधन तर देशाला चटका लावून गेले. तर आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते.

माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हणजे भाजप. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे जितिन प्रसाद यांनी भाजपत पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले.

का सोडले काँग्रेसला?
राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते.

महत्वाच्या बातम्या

IMP