चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका; पहिल्याच सामन्यातून महत्वाचा खेळाडू बाहेर!

dhoni

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु त्याआधीच या लीगच्या चार संघांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर पंजाब किंग्जचा, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला. डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स, जॉनी बेअरस्टो यांनी माघार घेतल्याने या संघांना त्यांच्या रूपाने मोठा धक्का बसला तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या बड्या खेळाडूला दुखापत झाल्याने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळण्यावर साशंकता आहे.

19 सप्टेंबरपासून उर्वरित हंगामातील पहिलाच सामना पार पडत आहे. पहिलाच सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा आहे. यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्समधील धुरंदर फाफ डु प्‍लेसी  दुखापतीमुळे आयपीएलमध्ये दिसणार नसल्याच्या चर्चा चालू आहेत.

सीपीएल 2021 च्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी फाफ डु प्लेसिसला दुखापत झालीय. त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण होता, ज्यामुळे त्याला त्या सामन्यातूनही बाहेर पडावे लागले. आता सलग दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडल्याने त्याची दुखापत गंभीर असू शकते, अशी चर्चा सुरु झालीय. त्यामुळे आता आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावरही साशंकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या