बीग बींनी स्वत:ला वेळ द्यावा; वाढदिवसानिमित्त्य त्यांना मिळाला प्रेमळ सल्ला

amitabh-bachchan

मुंबई : बॉलीवूडमधील बीग बी म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन. त्यांचे सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल सांगायचे तर गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले  असून आजवर कायम आहे. त्यांनी सतत सगळ्यांचे मनोरंजन करावे, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांची आहे. मात्र, त्यांनी थोडस स्वत:साठी वेळ काढून जगावं अशी प्रेमळ सल्ला मित्रमंडळींकडून  नुकताच संपन्न झालेल्या  वाढदिवसानिमित्त  मिळाला.

दरम्यान सलीम खान यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांनी निवृत्ती घेतली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे. अमिताभ आणि सलीम यांनी एकत्र जवळपास  दहा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत जया बच्चन यांनी देखील काम केले होते. ‘शोले’, ‘दीवार’, ‘मजबूर’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’ आणि ‘दोस्ताना’सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले असून त्यांची चांगलीच केमेस्ट्री जमली. अमिताभ यांनी इच्छेनुसार त्याच्या आयुष्यातील काही वर्षे जगू शकेल. आपल्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे आपण अभ्यास आणि शिकण्यात घालवतो. त्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. उदाहरणार्थ, माझे जग आता मर्यादित झाले आहे. मी ज्या लोकांसोबत फिरायला जातो ते सर्व चित्रपटसृष्टीतील नाही, तसेच बीग बींनी देखील करावे असा त्यांचे म्हणणं होते.

अमिताभ बच्चन हे हीरो होते आणि अजूनही आहेत. मात्र स्वत:साठी वेळ खर्च करावा असे मत चाहत्यांसह सलीम खान यांनी एका मुलाखतीत केले आहे.  त्यांनी आता आयुष्यातील काही वर्षे ही स्वतःसाठी देखील ठेवली पाहिजेत. अमिताभ यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप अप्रतिम काम केलं आहे. म्हणून त्यांनी आता या शर्यतीतून बाहेर पडायला हवे असे सलीम खान यांनी व्यक्त केले. बीग बींचा नुकताच ७९वा वाढदिवस साजरा करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आज ही ते सर्वांच्या मनावर राज्य करीत असून त्यांच्या प्रत्येक अॅक्शनवर प्रेम करणारे भरपूर चाहते आहेत. अमिताभ यांनी जवळपास चाळीस दशके चित्रपटसृष्टीला दिली असून तरीही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.

महत्वाच्या बातम्या