चाहत्याने चूक दर्शवताच बिग बींनी सोशल मीडियावर मागितली माफी

चाहत्याने चूक दर्शवताच बिग बींनी सोशल मीडियावर मागितली माफी

amitahb bacchn

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सोशल मीडियावर बरेच फोटो ते शेअर करत असताना पाहायला मिळतात. तसेच अनेक मुद्यांवर ते आपले मत मांडत असतात. अनेकदा बिग बी मुलाखतमध्ये अथवा शोमध्ये  हिंदीतूनच संवाद साधत असतात. तसेच ते हिंदीमध्ये देखील पोस्ट शेअर करतात. नुक्यातच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांची चूक चाहत्याने निदर्शनास आणून दिली आहे.

बिग बींना फेसबुकवर दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा देताना केलेल्या पोस्टवरून राजेश पांडेने कमेंट करत चूक लक्षात आणून दिली. ‘दशहरा’ आणि ‘पेशेवर’ हे दोन शब्द अशुद्ध लिहिले असल्याचं त्याने कमेंटमध्ये सांगितलं. बिग बींनी ‘दशहरा’ लिहिण्याएवजी ‘दशहेरा’ लिहिलं होतं. तसचं राजेशने बिंग बींच्या एका जुन्या सिनेमातील डायलॉगमध्ये देखील चूक होती हे निदर्शनास आणून दिलं. ”खुदा गवाह” या सिनेमात बिंग बींनी ‘पेशेवर मुजरिम’ म्हणण्याएवजी ‘पेशावर मुजरिम’ म्हंटलं होतं असे त्याने लक्षात आणून दिल आहे.

यानंतर अमिताभ यांनी देखील नम्रपणे आपली चूक लक्षात घेऊन झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. तसेच चूक सुधारणार असल्याचे आश्वासन देखील दिले. दरम्यान, अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या