बीड जिल्ह्यात विधानसभेची रणधुमाळी, आघाडी आणि युतीत होणार थेट लढत

बीड : साऱ्या राज्याचे लक्ष असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक चांगलीच रंगतदार होणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील पक्षांतर आणि शिवसंग्राम भाजपचा वाद आणि वाढलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दीमूळे निवडणुक चांगलीच गाजणार आहे.खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समाजला जाणारा बीड जिल्ह्यात आता भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहेत. यामूळे राष्ट्रवादी पक्षाने याच जिल्ह्यातून पुन्हा नव्याने मोठ बांधणी करीत पाच उमेदवार जाहिर करीत कामाला लागले आहेत. त्या तुलनेत भाजपमध्ये इच्छुकांची वाढत्या संख्येमुळे सुरू असलेली रस्सीखेच महायुतीतील घटक पक्ष आणि शिवसेनेने लावलेला जोर यामुळे महायुतीच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम आहे. वंचित आता असे उमेदवार रिंगणात उतरविणार, याकडेही लक्ष लागून आहे.

महायुतीत जागा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. युतीत जागावाटपात मागच्या वेळी ज्यांचा उमेदवार विजयी त्यांची किंवा जर दुसऱ्या स्थानावर असलेल्यांना ही जागा, असे युतीच्या जागावाटपाचे सूत्र आहे. आपण दुसऱ्या स्थानावर आणि शिवसेना तिसऱ्या स्थानावर हे गणित पुढे करून ही जागा आपल्यालालच मिळेल, असा युक्तिवाद करीत आपल्यालाच उमेदवारी, असा विश्वास शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे करीत आहेत. भाजपकडूनही राजेंद्र मस्के इच्छुक आहेत. परळीत भाजपकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान माजलगावमधून राष्ट्रवादीने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येथून भाजपच्या विद्यमान आमदार आर. टी. देशमुखांसह अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, मोहन जगतापदेखील स्पर्धेत आहेत. ओमप्रकाश शेटेंनीही येथून संपर्क वाढविला आहे. त्यामुळे भाजपचे इथे कोण, यावर नजरा खिळल्या आहेत. आष्टीत आघाडीत राष्ट्रवादी की कॉंग्रेस असा सस्पेन्स आहे.