Narendra Modi | मुंबई : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत (Vedanta Foxconn Project) माहिती अधिकाराअंतर्गत काही मुद्दे समोर आले आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत असल्याची टीका करत विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. अशातच महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे.
मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. “केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, “स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तसेच सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली. गेल्या आठ वर्षात ८ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Lunar Eclipse | खगोलप्रेमींसाठी 8 नोव्हेंबरला दिसणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण
- Sambhaji Bhide | भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र; “पत्रास कारण की…”
- Saamana | सामनाच्या पहिल्याच पानावर खोके सरकारची जाहीरात, राजकीय चर्चांना उधाण
- Akshay Kumar | छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये करणार पदार्पण
- Ambadas Danve | मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही?; अंबादास दानवे म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”