एकनाथ खडसेंचा मोठा आरोप, मंत्रालयात उंदीर घोटाळा

eknath khadse

मुंबई: एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडीस आणला आहे. भाजपला घरचा आहेर देण्यासाठी खडसे नेहमी अग्रेसर असतात. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. खडसे म्हणाले, मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आला होता. ६ महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र ७ दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला ४५ हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. तसेच त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवानाही नव्हता.

शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. त्यांनी मंत्रलयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खूप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी सभागृहात केली.

Loading...