fbpx

अखेर भूपेश बघेलच छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातील मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर अखेर कॉंग्रेस कडून छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची देखील घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असणारे भूपेश बघेल यांच्या हातीच राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे. छत्तीसगड मध्ये मुख्यमंत्री पदासाठी चार दावेदार होते. पण अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली आहे. कॉंग्रेस कडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

भूपेश बघेल सध्या छत्तीसगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. त्या सोबतच भूपेश बघेल हे कॉंग्रेसचे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. विधानसभा निवडणुकीत ९० जागा पैकी काँग्रेसने ६८ जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी तब्बल १५ भाजपचे रमणसिंह मुख्यमंत्री होते. यानंतर आता भूपेश बघेल छत्तीसगड मुख्यमंत्री असतील.