गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेलांचा थोड्याच वेळात शपथविधी; गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती

amit shah

अहमदाबाद : भूपेंद्र पटेल हे गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री होणार आहेत. ते आज सोमवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी शपथ घेणार आहे. या शपथविधीला गृहमंत्री अमित शाह उपस्थित रहाणार आहे.

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. रविवारी दुपारी गुजरात भाजपा पक्षश्रेष्टींची बैठक झाली. या बैठकीला १०३ आमदार उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाची मुख्यमंत्री पदी घोषणा करण्यात आली. आता घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची वर्णी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर लागली आहे.

अशी चर्चा आहे की, आरएसएसनं एक सिक्रेट सर्वे केला होता आणि त्यात रुपाणींच्या नेतृत्वात सत्ता राखणं शक्य नसल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनीही या सर्वेबाबत भाष्य केलं होतं. त्याच सर्वेच्या आधारावर मंत्रिमंडळातही मोठे बदल असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील काम पाहिले आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात. आनंदीबेन पटेल यांच्याच मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे विक्रमी मतांनी निवडूण आलेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाने पटेल मुख्यमंत्री दिला आहे.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिल्या शुभेच्छा
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी भूपेंद्र पटेल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते माझे जुने कौटुंबिक मित्र आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मला आनंद होईल. अनेकदा त्यांनी माझे मार्गदर्शन घेतले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह गुजरातला येत आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जात आहे. असे नितिन पटेल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या