‘भुपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री, जय शाह यांची संधी हुकली’

jay shah

मुंबई : भूपेंद्र पटेल हे गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री होणार आहेत. ते आज सोमवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी शपथ घेणार आहे. या शपथविधीला गृहमंत्री अमित शाह उपस्थित रहाणार आहे. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

रविवारी दुपारी गुजरात भाजपा पक्षश्रेष्टींची बैठक झाली. या बैठकीला १०३ आमदार उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाची मुख्यमंत्री पदी घोषणा करण्यात आली. आता घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची वर्णी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर लागली आहे.

दरम्यान बैठकीत सगळ्यात मागे बसलेले,पहिल्यांदाच आमदार झालेले भुपेंद्र पटेल यांची अनेपेक्षित रित्या मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काँग्रेसने यांचे तर ट्विटर वर फक्त 14 हजार फॉलोवर्स आहेत, सीएम कसं बनवलं असा देखील सवाल केला आहे. तर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व त्यांचे चिरंजीव जय शाह यांच्यावर निशाना साधला आहे. ‘भुपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री, जय शाह यांची संधी हुकली’ असा टोमणा त्यांनी मारला आहे.

दरम्यान भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते.

महत्वाच्या बातम्या :