मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १७ सप्टेंबर रोजी भूमिपूजन करण्यात येणार असून, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिली.

जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत निजामकालीन असल्याने इमारतीची पडझड सुरु झाली होती. कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत होते. यामुळे नवीन इमारत होणे गरजेचे होते. यासाठी पदाधिकारींनी पाठपुरावा करून नवीन इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळवली आहे. यानुसार, निजामकालीन इमारत वगळता नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती पाडून त्याठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. इमारतीचे बांधकामासाठी १७ सप्टेंबर रोजी भूमिपूजन कायर्क्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

ग्रामविकास व महसूल मंत्री सत्तार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला होता. यावर ठाकरे यांनी होकर दर्शविला असून १७ सप्टेंबर रोजी होणारी भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सभापती किशोर बलांडे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या