पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन भुईकोट किल्ल्याचा विकास करणार -खा. संभाजी राजे भोसले

Sambhaji Raje Bhosale

सोलापूर : रायगड प्राधिकरणामुळे माझा पुरातत्त्व विभागाच्या नियमावलींचा अभ्यास झाला आहे. तेथून सोलापूर भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाची मंजुरी कशी आणायची ते मी पाहतो. केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी आणू. लवकरच विकासाचा आराखडा तयार करू. येथे लेझर शो, म्युझिक शो आदींसह खूप काही करता येईल. येथे सोलापूरसह आपण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास मांडू.

Loading...

किल्ल्याची स्थिती खूपच चांगली आहे. त्यामुळे लवकरच याच्या संवर्धनाच्या कामाला लागू, अशी ग्वाही खासदार तथा गड संवर्धन समितीचे ब्रँड अॅम्बेसेडर छ. संभाजी राजे भोसले यांनी दिली.शिवपूत्र शंभूराजे या महानाट्याच्या निमित्ताने ते सोलापुरात आले होते. त्यात सोलापूरच्या किल्ल्याचा विषय निदर्शनास अाणून दिला. त्यानंतर सकाळी भुईकोट किल्ला व परिसराची त्यांनी पाहणी केली.

अभ्यासक नितीन अणवेकर यांनी किल्ल्याबद्दल माहिती दिली. राजेंनी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, नागबावडी, बाळंतीण विहीर, कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिर, ३२ खांबी वास्तू, गॅलरी, विशेष खोल्या, तटबंदी आदी सर्व ठिकाणांची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातच पंजाब तालीम येथील मुस्लिम तरुणांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.सिद्धेश्वर मंदिराचाही विकास व्हावा, नाशिकचे आमदार डॉ. राहुल अहीर यांची मंदिराला भेटग्रामदैवत अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धेश्वरांच्या मंदिराचाही विकास व्हावा, अशी इच्छा नाशिकचे आमदार डॉ. राहुल अहीर यांनी व्यक्त केली.

सोलापुरात पहिल्यांदाच आलेले आमदार अहीर यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सकाळी साडेअकरा वाजता भेट दिली. शहराच्या मध्यभागी असणारा किल्ला व सिद्धेश्वर मंदिर या देखण्या वास्तू आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी राजे हे राज्यातील दुर्ग व किल्ल्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यांच्या सहकार्याने विकास साधता येईल. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.Loading…


Loading…

Loading...