हल्लाबोलच्या सभेतून भुजबळांची तोफ उद्या पुण्यात धडाडणार!

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन ! छगन भुजबळांची उपस्थिती

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. नुकतेच जामिनावर सुटलेले माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २०व्या वर्धापनदिनाचे औचित्य या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भ, मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची सांगता देखील उद्याच्या सभेत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्टवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. मात्र भाजपने या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.

दरम्यान, उद्याची सभा माझ्यासाठी ट्रायल आहे. त्यानंतर राज्यात भेटी देणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. उद्याच्या सभेला अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

You might also like
Comments
Loading...