fbpx

छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँगचा होणार लिलाव

chagan bhujbal

टीम महाराष्ट्र देशा : मर्चंट बँकेच्या थकबाकी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना मोठा धक्का बसलाय. बँकेचं 4 कोटी 34 लाख थकीत कर्जा प्रकरणी आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा लिलाव होणार आहे. 30 नोव्हेंबरला या कंपनीचा लिलाव होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात हा लिलाव होणार आहे. या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपये १ एप्रिल २०१७ पासून थकले आहेत. त्यावरील व्याज व मूळ थकीत रक्कम आता या लिलावातून वसूल केली जाणार आहे.

आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर ही भुजबळांच्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, सत्यने केसकर हे या कंपनीचे संचालक असून त्यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं लिलाव पद्धतीने 2009 मध्ये साखर कारखाना विकत घेतला होता. त्यांनतर तीन ते चार वर्षांनी करखान्याच्या कामाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षे गाळप हंगामही या कारखान्यात चालू होता. 16/ 17 ला शेवटचा हंगाम निघाला, त्यावेळी शेकडो कर्मचारी या कारखान्यात कामाला होते.

त्यांनतर कारखाना अडचणीत सापडला तो आजतागायत बंद आहे. या कारखान्याच्या 4 कोटी 34 लाखाच्या कर्जासाठी ज्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या त्यावर वसुली कारवाईला नामको बँकेनं सुरुवात केल्यानं जामीन म्हणून तारण ठेवलेल्या मालमत्ता बँकेनं ताब्यात घेतल्या. याकरिता वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित करून कारवाई सुरू केल्याचं बँकेने सांगितलं होतं.

विविध आरोपाखाली तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. त्यानंतर हा त्यांना मोठा धक्का आहे. भुजबळांच्या कंपनीचा प्रतीकात्मक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ही रक्कम न भरल्यामुळे आता या कंपनीचा लिलाव होणार आहे.

1 Comment

Click here to post a comment