fbpx

भुजबळ, तटकरे शिवसेनेच्या वाटेवर, तर अजित पवार म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला आहे, तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खा सुनील तटकरे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला रामराम करणाऱ्या नेत्यांबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी, तसेच सरकारकडून काही फायदा मिळवण्यासाठी अनेकजण पक्ष सोडत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखू शकत नाही, असं पवार यांनी म्हंटले आहे. यवतमाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत. उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. यापेक्षा सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

हा तर निव्वळ खोडसाळपणा, शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोलल जात आहे. सुनील तटकरे यांनी मात्र सर्व वृत्तांच खंडन केले आहे. आपल्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या हा निव्वळ खोडसाळपणा आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेससोडून इतर कोणत्याही पक्षात आपण जाणार नाही. अशा बातम्यांना तातडीने आळा बसायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या