भुजबळ समर्थकांची देशभर निदर्शने

chagan bhujbal

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात आज मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, राजस्थानासह देशातील अनेक राज्यांमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर भुजबळ समर्थकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भुजबळ समर्थकांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.

Loading...

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक आणि कोट्यावधी शोषित-पिडीत व वंचितांचे आशास्थान असलेले छगन भुजबळ तसेच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंत्रणांनी गेल्या २२ महिन्यांपासून चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवलेले आहे. बंदी करून जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य आहे असा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच न्यायनिवाडा दिला आहे. तरीही त्यांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांचा दोष अद्याप सिद्ध झालेला नाही तरीही केवळ खोट्या-नाट्या आरोपांमुळे देशातील बहुजनांच्या या नेत्याला कारागृहात डांबून ठेवणे हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय असल्याची भावना यावेळी देशभरातील भुजबळ समर्थकांनी व्यक्त केल्या.Loading…


Loading…

Loading...