fbpx

भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरा – कॉंग्रेस आमदार

bhujbal

नाशिक: छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असून त्यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन इगतपुरीच्या आ. निर्मला गावित यांनी केले. निर्मला गावित यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्याय पे चर्चा बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

निर्मला गावित पुढे म्हणाल्या की, छगन भुजबळ हे विकासाची दृष्टी असलेले नेते असून सभागृहात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. सद्याची व्यवस्था ही हुकुमशाही पद्धतीची असून जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्त्न केला जात आहे. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी आणि लोकाभिमुख अशा नेत्याला अडकवून ठेवले जात आहे. परंतु हा आवाज दबणार नाही नसून त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करून विधानभवनात देखील आवाज उठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार जयवंतराव जाधव म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यावर जी कारवाई सुरु आहे. त्यांच्याबद्द्ल जनतेत चुकीची माहिती पसरविण्याचे काम या जातीवादी सरकार कडून होत आहे. त्यामुळे लोकांना वस्तूस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बाळसाहेब गाढवे, गोरख बोडके, प्रल्हाद जाधव, नारायण लोखंडे, ज्ञानेश्वर गायकवाड, बहिरू मुळाने, संपत सकाळे यांनी आपली मनोगत व्यक्त करून छगन भुजबळ यांनी केलेल्या विकास कामाबद्दल चर्चा करून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.