आमचा विकास कारागृहात कोंडला गेलाय, भुजबळ समर्थकांनी ‘राज’दरबारी मांडली कैफियत

'राज'दरबारी

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आमचा विकास कारागृहात कोंडला गेलाय, नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेताच नाहीये, अशी भावना भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.

आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी जिरवा, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार देविदास पिंगळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनावणे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

तर भुजबळांना कधीच जामीन मिळायला हवा होता. भुजबळ जोडो नाही तर भुजबळ छोडो आंदोलन झालं पाहिजे, असं राज ठाकरे या समर्थकांना म्हणाले.