भुजबळ समर्थक सोमवारी घेणार राज ठाकरे यांची भेट

नाशिक :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राज्यातील भुजबळ समर्थक एकत्र आले असून त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थक सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजगड, प्लाझा थिएटर शेजारी, दादर, मुंबई येथे भेट घेणार आहे. तसेच दि.६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

You might also like
Comments
Loading...