‘तुम्ही शाळेत जात होता तेंव्हा मी आमदार होतो, आता काय बोलायचे हे तुमच्याकडून शिकू काय?’

टीम महाराष्ट्र देशा – देवेंद्र फडणवीस यांचा म्हणन असे आहे की, यांना नकलाकार बोलवावे लागतात. भुजबळ तुम्ही काय बोलता, तुम्ही काय स्वातंत्र्य लढ्यात गेलो होतो काय. मला त्यांना सांगायचं आहे की, मी नकलाकार आहे तर तुम्हाला एवढी धडकी का भरलीय. नकलाकार आहे तर मला सोडून द्यायचे होते. देवेंद्रभाऊ आता काय मी काय बोलायचे हे तुमच्याकडून मी शिकू काय .अरे मी १९८५ला आमदार होतो त्यावेळेला तुम्ही शाळेत शिकत होतात, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांच्या टीकेला भुजबळ यांनी उत्तर दिले.

यावेळी भुजबळ म्हणले, माझ्या तुरुंगाचा आणि जामीनाचा उल्लेख तुम्ही करत आहात, मला घाबरवायचा तुमचा प्रयत्न आहे पण मी घाबरत नाही, मी सिंहासारखा जगेन, देवाने मला किती आयुष्य दिले आहे ते मला माहित नाही पण जगेन तेवढा काळ सिंहासारखा शूरपणानेच जगेन, तुमच्या पक्षातही अनेक लोक जामीनावर आहेत त्यांच्यावर तर माणसांचे खून केल्याचे आरोप आहेत, राज्यसरकारवर टीका करतानाच मोदी सरकार सर्व आघाड्यावर फेल आहे.

राज्यातील अनेक प्रश्नांवर टीक करून ते म्हणाले हे मोदी सरकार सर्व आघाड्यावर फेल आहे. यांची जीएसटी आणि नोटाबंदी फेल आणि आता राफेल, सगळीकडे हे फेलच आहेत. यांनी रिझर्व्ह बॅंकेचे वाटोळे केले यांच्या काळात रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर इतिहासतज्ज्ञ आहे, सर्व आघाड्यावर या सरकारने गोंधळ घातल्याची टीका त्यांनी केली.

निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आणि शेवटही झाला. सत्तेची सुरुवात ज्या परळीतून झाली त्याच परळीतून मस्तवाल सत्तेचा समारोप होईल. भावनिक करण्याचे राजकारण आता नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान खासदार प्रितम मुंडे याच्यावर निशाना साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित आहेत.