जनक्षोभ अधिक तीव्र केल्याशिवाय भुजबळांना न्याय मिळणार नाही – श्रीराम शेटे

1 chhagan-bhujbal

नाशिक : जनक्षोभ अधिक तीव्र केलय छगन भुजबळ यांना न्याय मिळणार नाही असे प्रतिपादन कादवा कारखान्याचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. विकासस्थळी अन्याय पे चर्चा घ्यावी या अनोख्या संकल्पनेतून जानोरी नाशिक विमानतळ येथे सदर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Loading...

सदर चर्चेचे आयोजन डॉ.योगेश गोसावी व जानोरीचे सरपंच विष्णूपंत काठे यांनी केले होते.यावेळी श्रीराम शेटे म्हणाले की, छगन भुजबळ हे नाशिकला येण्याअगोदर नाशिक जिल्ह्याला खंबीर नेतृत्व नव्हते. भुजबळांच्या रूपाने नाशिकला खंबीर नेतृत्व मिळाले. भुजबळांनी विकासापासून दूर असलेल्या नाशिक जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कायापालट केला. मात्र सद्याच्या व्यवस्थेकडून छगन भुजबळांवर अन्याय केला असून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर जनक्षोभ उभा केल्या शिवाय न्याय मिळणार नाही यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले.

यावेळी आ. नरहरी झिरवाळ म्हणाले की, छगन भुजबळ नसतील तर महाराष्ट्रच गुजरातला जाणारे पाणी आपण वाचवू शकणार नाही. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविले जात आहे. गुजरातला पाणी देण्यासाठी छगन भुजबळांना कारागृहात डांबून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भुजबळांवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात विधिमंडळ सभागृहात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भुजबळांच्या प्रयत्नामुळे दिंडोरी तालुक्याला पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी मिळाले. भुजबळ अडचणीत असल्यामुळे सर्व वळण योजनांचे कामे रखडली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, डॉ.योगेश गोसावी, विष्णूपंत काठे, बाळासाहेब कर्डक, प्रवीण जाधव, शहाजी सोमवंशी यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासावर चर्चा करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबत आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त केल्या.Loading…


Loading…

Loading...