भुजबळ सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्याच्या तयारीत !

पुणे : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो. असे स्पष्ट केले. त्यांनी शनिवारी गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा येथे भेट देऊन महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

छगन भुजबळ पक्षाच्या वर्धपान दिनानिमित्त आयोजित हल्लाबोल मेळाव्यासाठी पुण्यात आले,  असून आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरुन तुरुंगातून सुटल्यानंतर ते प्रथमच जाहीर सभेला हजेरी लावत आहेत. त्यामुळे भुजबळ आज सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. आजच्या सभेत भुजबळ काय बोलतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.