छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार, तर गणेश नाईक घरी बसले

Subhash-Desai,कोंबडी चोर नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना संपविण्याची भाषा करणारे संपले, छगन भुजबळ तुरुंगात गेला. नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाला.गणेश नाईक घरी बसले असल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. नेरूळ मधील आगरी कोळी भवनमध्ये नवी मुंबईतील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा आयोजीत केला होता. यावेळी सुभाष देसाई बोलत होते.

नारायण राणेंना शिवसेना संपविण्याची भाषा केली पण तोच महाराष्ट्रातून तडीपार झाला. हिंदी व इंग्रजी शिकण्यात त्याची सहा वर्ष निघून जातील अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याचे सुभाष देसाईंने स्पष्ट केले.Loading…
Loading...