दोन माजी उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड भेट, नक्की चर्चा काय झाली ?

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणारे दोन नेते छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान भूषवणाऱ्या या दोन नेत्यांची सध्या राजकीय वजन ढासळले आहे.

समता परिषेदेच्या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ सोलापूर जिल्हात आले आहेत. समता परिषेदेच्या सांगोला इथल्या कार्यक्रमाला जाताना छगन भुजबळ यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. भेटीदरम्यान भुजबळ आणि मोहिते यांनी काही काळ बंद दाराआड चर्चा केली. या दोन नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

You might also like
Comments
Loading...