‘भुजबळ जामीनावर बाहेर आहेत पण अमित शहा हे तडीपार होते, हे ही लक्षात असू द्या’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सरकार विरोधात निर्धार परिवर्तन यात्रा राज्यभर काढण्यात आली होती. या यात्रेचा शनिवारी धनंजय मुंडे यांच्या गावी म्हणजेच परळी येथे समारोप झाला. त्यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जमलेल्या जन समुदायला संबोधित करताना सरकारवर आणि सत्ताधारी नेत्यांवर चांगलाच शाब्दिक हल्ला चढवला. तर यावेळी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला चांगलेच प्रतिउत्तर दिले.

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, आमचे छगन भुजबळ जामीनावर आहेत, हे आम्हाला माहित आहे. पण भाजप अध्यक्ष अमित शहा हे तडीपार होते, हे ही लक्षात असू त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या वाट्याला जाऊ नये अन्यथा आमच्या कडे देखील जशास तसे उत्तर देण्याची ताकद आहे.

दरम्यान याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण जामिनावर बाहेर आहात त्यामुळे आमच्यावर टीका करू नये असा जोरदार टोला छगन भुजबळ यांना लगावला होता. तर या वक्तव्याचा धनंजय मुंडेन कडून चांगलाच समाचार घेण्यात आला. सदर कार्यक्रमास जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्ती प्रदर्शनच होते.Loading…
Loading...