भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, सत्कार करण्यासाठी समर्थक थेट रुग्णालयात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही ते केईएम रुग्णालयातच आहेत.दरम्यान काही भुजबळ समर्थकांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे, मोठा हार घालून सत्कार केला.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

काय आहे प्रकरण ?

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.

Shivjal