‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’

chandrkant patil

मुंबई: आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. यावेळी ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय अजून झाले नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आता आरक्षणावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही ओबीसी समाजाच्या हिताचे ढोंग रचणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री या विषयाबाबत तोंडाला डिंक लावल्याप्रमाणे गप्प बसतात ही आश्चर्याची बाब आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणूका होऊ देणार नाही. असा इशारा यावेळी त्यांनी ट्वीट करत दिला आहे.

भाजपाचे या विषयाबाबतचे धोरण अतिशय सुस्पष्ट आणि ठाम आहे. राजकीय आरक्षण हा ओबीसी समाजाचा अधिकार आहे. मा. न्यायालयाचा बागुलबुवा दाखवून जर कोणी असे म्हणत असेल की आम्ही ओबीसी उमेदवारांना आरक्षण देणार नाही, तर ते आम्ही होऊ देणार नाही. गेल्या काही दिवसात राज्य सरकारच्या अखत्यारीतील राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या प्रभागरचनेचे आदेश दिले. राज्य सरकारच्या निष्फळतेमुळे रद्द झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी लागू न करण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे यातून स्पष्ट दिसून येते आहे असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या