सोवळ्यातील स्वयंपाकाचा वाद ही आहे दुसरी बाजू

वेबटीम- ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.या वादाची दुसरी बाजू आता समोर आली आहे.

निर्मला यादव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.निर्मला यादव यांच्याशी संपर्क साधला असता निर्मला यादव यांनी त्यांची बाजू मांडली आहे.खोले यांच्याकडे मला जोशी या गुरुजींनी काम मिळून दिले होते.मी त्यांना कधीही आपण ब्राम्हण असल्याचे सांगितले नाही.

खोले यांनी देखील मला कधीच जात विचारली नाही.माझे आणि जोशी यांचे काही कारणास्तव वाद झाले.त्यानंतर जोशींनी मी ब्राह्मण नसल्याचे खोलेना सांगितले. यानंतर वादाला सुरुवात झाली.असे निर्मला यादव यांनी सांगितले.