भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण: एकनाथ खडसेंना क्लीन चिट ?

eknath khadse

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने सांगितले मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

काय आहे भोसरी जमीन खरेदीप्रकरण ?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती.

जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. महसूलमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीच रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी केल्याने संशय निर्माण झाला होता.

या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु झाला. याप्रकरणी खडसेंची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आणि शेवटी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

4 Comments

Click here to post a comment







Loading…




Loading...