इंदुरीकर-देसाई वादात आता ‘भोर’ महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी

टीम महाराष्ट्र देशा – किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत आहे. पण काल (२१  फेब्रुवारी) मी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या माणसाने मला कापून टाकण्याची धमकी दिली असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

देसाई यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ २१ फेब्रुवारी मी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला. त्यावर समोरुन “मी सोमनाथ महाराज भोर, अकोले तालुक्यातून बोलत आहे, असे सांगण्यात आले. तुम्ही तृप्ती देसाई बोलताय का असा प्रश्न विचारल्यानंतर मी हो म्हणून उत्तर दिले.

Loading...

त्यानंतर तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्याशिवाय त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळही केली,” असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, मला कापून टाकण्याची भाषा करणाऱ्या या महाराजांकडून माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. तसेच इंदोरीकरांचे समर्थक त्यांच्या सांगण्यावरून मला धमक्या देत आहेत, असे तयी यावेळी सांगितले आहे. याबाबत त्यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका