स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पोहचली खुलसी गावात वीज

भोर तालुक्यात अतिदुर्गम भागातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या खुलशी या गावातील धनगरवस्तीला खऱ्या अर्थाने आता स्वातंत्र्य मिळणार आहे.
कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या वस्तीवर वीज पोचणार आहे.
 
धनगरवस्तीतील संतोष शिंदे या युवकाच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीने खुलशी गावातून धनगरवस्तीसाठी विद्युतवाहीनीचे काम सुरू केले.
या कामाचा भूमीपूजन समारंभ नुकताच पार पडला,
खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या खासदार निधीतून निधी मंजूर झाला व अवघ्या ५-६ घरांसाठी हे काम करण्यास त्यांनी भाग पाडले.
या कामासाठी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून १९ लाख ५० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला. शिवकालीन धनगर वस्तीवरील नागरिकांना आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे. ” राजगडावर दही ताक पाणी नेऊन आपला उदरनिर्वाह करणारे रहिवासी, आमचा जगाशी काही संपर्कच नव्हता” संतोष शिंदे म्हणाले. 
खासदारांनी पाठवले लाडू. 
खासदार सुप्रियाताई सुळे कामात व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत परंतु त्यांनी आपले प्रतिनिधी प्रवीण शिंदे यांच्या मार्फत धनगर वस्तीवरील नागरिकांना लाडू पाठवले. 
त्यावेळी उपस्थित भोर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत बाठे ,
मा.उपसभापती मानसिंग बाबा धुमाळ ,उपसभापती विक्रमदादा खुटवड ,प्रविण शिंदे , महावितरणचे अधिकारी श्री.डामसे साहेब व श्री.डेरे साहेब, भोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, वेल्हे शाखा महावितरण अभियंता गणेश झरांडे, गणेश खुटवड तसेच सर्व ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.