सोलापुर : ८५ मिनिटात मोदी करणार सहा विकास कामांचं भूमिपूजन

narendra modi south africa

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी 9 जानेवारी रोजी सोलापुरच्या दौर्‍यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयारी सुरु आहे. मोदींच्या दौर्‍यावर 6 विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार्क स्टेडियम सोलापूर येथे होणार आहे. नरेंद्र मोदी हे एकूण 85 मिनिट सोलापुर शहरात असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

Loading...

मोदी यांच्यासोबत राज्यपाल के.विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्री हरजितसिंग गिरी सोलापुरच्या दौर्‍यावर येणार आहेत. तसेच ही शासकीय कार्यक्रम असल्याने केंद्रीय आणि राज्यातील विविध वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरने बिदरहुन सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर पार्क स्टेडियम येथे इलेट्रिक कळ दाबून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सहा विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर उपस्थित लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सोलापूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने बिदरकडे रवाना होतील, अशी माहिती डॉ.भोसले यांनी दिली.

या दौर्‍यात उजनी ते सोलापूर या 360 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचे भूमिपूजन, स्मार्ट सिटीतील एबीडी एरियातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन सुविधा 190 कोटीच्या कामाचे भूमिपूजन, हद्दवाढ भागात मनपाच्यावतीने करण्यात येणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत 180 कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, मनपाच्यावतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एस.टी.पी प्रकल्पाचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतून नियोजित 30 हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन, सोलापूर धाराशिव या चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते होणार असल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले.

सभेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय एसपीजी स्पेशल पोलीस ग्रार्ड ची 25 टिम सोलापूरात दाखल झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना एसपीजी टिमनी संबंधित विभागांना सूचना दिल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले. तसेच

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा शासकीय दौरा असून, कोणत्याही प्रकारची अनूचित प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येकांनीच काळजी घ्यावी. काळे झेंडे दाखवून सोलापूर शहर आणि राज्याचे नाव देशात बदनाम होईल असे वर्तणूक करु नये. सुरक्षेसाठी महिलांनी पर्स, पाण्याची बाटली, बॅग सोबत कार्यक्रम स्थळी आणू नये. पिण्याच्या पाण्याची आयोजक सोय करतील.”

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेLoading…


Loading…

Loading...