भूमीचा ट्रेलर हिट

संजय दत्तचं पुनरागमन

संजय दत्त तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चित्रपटश्रुष्टीत पुनरागमन करत आहे.संजय दत्तची मुख्य भूमिकाअसलेला ‘भूमी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओमांग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून रसिकांच्या चांगल्याचा पसंतीला उतरला आहे .

‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे.  दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत.मेरी कोम, सरबजित यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.अभिनेत्री अदिती राव हैदरी ‘भूमी’च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल. बाप-लेकीच्या आयुष्यात आलेल्या एका वादळाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटात संजय दत्तने लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चाहत्यांना संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

You might also like
Comments
Loading...