‘रक्षाबंधन’ या चित्रपटात खिलाडी कुमारसह दिसणार भूमि पेडणेकर

अक्षय भूमी

मुंबई: बॉलीवूडमध्ये बहुतेक हे पहिल्यांदाच घडत आहे की खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या चित्रपटाची प्रेक्षकांना वाट बघावी लागत आहे. कारण अक्षय कुमार हा त्याच्या जलद चित्रीकरणासाठी ओळखला जातो. मात्र मागील वर्षी उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. मात्र आता अक्षयचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची अधिक चर्चा होत आहे. या सिनेमात आता  अभिनेत्री भूमि पेडणेकर दिसणार आहे.

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’ सिनेमाचे दिग्दर्शक एल राय आणि भूमि पेडणेकरसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. या फोटोत तिघेही एका उंच ठिकाणावर बसून दिलखुलास हसत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत अक्षय म्हणाला की, ‘तुम्ही जेव्हा खुश असता तेव्हा ते स्पष्ट दिसून येतं. रक्षाबंधनमध्ये भूमि पेडणेकरला घेतल्याचा खूप आनंद होत आहे’.

तर दुसरीकडे अभिनेत्री भूमि पेडणेकरने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत म्हणाली, ‘खूपच खास सिनेमा आणि खूपच खास रीयूनियन. मी माझ्या दोन आवडत्या क्रिएटिव्ह पावर हाउस व्यक्तींसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे. या खास सिनेमाचा मला भाग बनण्याची संधी मिळाली यासाठी मी आभारी आहे.’ असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळते.

तसेच अक्षय कुमारचे येत्या काळात एक दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘बेलबॉटम’ आणि त्यानंतर ‘रामसेतू’ या चार धमाकेदार चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP