हुंड्याच्या मागणीसाठी रजिस्टर पोस्टाद्वारे पत्नीला तोंडी तलाक

bhiwandi-man-sends-triple-talaq-notice-by-registered-post

ठाणे : भिवंडीमध्ये एका इसमाने रजिस्टर पोस्टाने पत्नीला तोंडी तलाक दिल्याची घटना घडली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी हा तलाक देण्यात आल्याचे सांगत पीडित महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पती सरदार मन्सूरी, सासरा इसरार ,सासू जुलेखा, दीर रेहान, जाऊ अफरीन अशी गुन्हा दाखल केलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. पीडित महिला शबनम हिचे मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे २०१६ रोजी सरदारसोबत निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून शबनमच्या आई-वडिलांनी जावई सरदारला मोटार सायकल दिली होती. मात्र मात्र सरदार आणखी एक मोटार सायकल, टीव्ही, सोफा आणि 50 हजार रुपयांची मागणी शबनमकडे करत होता. या मागणीला शबनम नकार देत असे. तेव्हा क्षुल्लक कारणावरुन सरदार शबनमला जबर मारहाण करत असे. तसंच तिचा मानसिक छळही सुरु होता.

या मागणीला शबनमने नकार दिल्यामुळे सरदारने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली आणि अखेर तिला रजिस्टर पोस्टाद्वारे तलाक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

bhiwandi-man-sends-triple-talaq-notice-by-registered-post