कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही; यूपीतील मंत्र्याची भीष्म प्रतिज्ञा

महेश गुप्ता

लखनौ – देशभरात कोरोनाने थैमान घातल्यावर राज्यांसह केंद्र सरकारने देखील मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून कोरोनाच्या साथीला काही प्रमाणात आटोक्यात आणल्याचे चित्र आहे. असं असलं तरीही वेगवेगळे व्हेरीयंट तसेच कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या धोक्यामुळे अवघ्या देशाची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी महेश गुप्ता यांनी एक प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत देशातून कोरोनाच्या संसर्गाचा खात्मा होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा गुप्ता यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून आपण अन्न ग्रहण करत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

गुप्ता म्हणाले की, आज योगींच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात अक्राळविक्राळ रूप घेतलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता उत्तर प्रदेश पूर्णपणे तयार आहे. मुलांसाठी वेगळे वॉर्ड तयार केले आहेत. तसेच आवश्यक मशिनरी लावण्यात आली आहे.

गुप्ता यांनी सांगितले की, अन्य देशांच्या तुलनेत पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या साथीला नियंत्रित केले आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र मी प्रार्थना करतो की, तिसरी लाट भारतात आणि उत्तर प्रदेशात येऊच नये. त्यासाठीच मी भीष्म प्रतिज्ञा केली आहे. की हा कोरोना नामक शत्रू माझ्या प्रिय भरतातून आणि संपूर्ण जगातून नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP