मतदानाच्या आधीच ‘हा’ भाजप उमेदवार वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ भाषेत टिका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जनभावनांमध्ये उद्रेक होत आहे. आष्टीमध्ये धनंजय मुंडेंच्याविरोधात प्रचंड मोठा मोर्चा निघाला.

या मोर्चात आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे हे पण सहभागी झाले होते. या मोर्चात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे भीमराव धोंडे यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. राष्ट्रवादीने भीमराव धोंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर भीमराव धोंडे यांनी लोकांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केलेले पंकजा मुंडे संदर्भात विधान लक्षात ठेऊन गावागावातून मतदानातून निषेध करा. तसेच गावागावात त्यांचे पुतळे जाळून निषेध करा, निषेध व्यक्त करताना कमळाचे चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करा,असे वक्तव्य केले आहे .

दरम्यान,यामुळे आदर्श आचारसंहिता सुरू असताना व प्रचाराची मर्यादा संपलेली असताना भीमराव धोंडे यांनी जाहीर भाषणामध्ये केलेले वक्तव्य हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून या बाबत विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे यासंदर्भात तक्रार देणार असल्याचे समजते. भीमराव धोंडे अडचणीत सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या