भीमा कोरेगावचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद

st bus

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे वादातून झालेल्या दगडफेकीचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अहमदनगर बस स्टॅन्ड व श्रीरामपूरमध्ये देखील पडसाद उमटले आहे. अहमदनगर मध्ये माळीवाडा बस स्टँडवर एस टी बसेसवर दगडफेक करण्यात तसेच मार्केटयार्ड, कायनेटिक चौक, व सर्जेपुरा भागात परिसरात दगडफेक करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये काही भागात बंद आहे तर रेल्वे स्टेशन, भिंगार परिसरात पूर्णपणे बंद आहे. एस.पी., एस. आर.पी. व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. व नागरिकांना शांत रहाण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...