भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणाची रा.स्व.संघाकडून निषेध

मुंबई : महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेमागे दोन गटामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा आरोप रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी केला आहे.

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील कोरेगाव,पुणे आणि अन्य भागांमध्ये झालेला घटना या अत्यंत चुकीची आणि दुखद आहेत, असे डॉ. वैद्य यांनी हिंदुस्थान समाचारशी बोलतांना सांगितले. दरम्यान, या घटनेसाठी ज्या व्यक्ती जबाबदार आहेत. त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

काही व्यक्ती दोन गटांमध्ये वाद निर्माण करत असून नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनी शांतता आणि संयमाने राहावे, असे आवाहनही यावेळी डॉ. वैद्य यांनी केले.