Bhima koregaon violence : सुरेद्र गडलींगची प्रकृती बिघडली; उपचारासाठी ससूनमध्ये दाखल

पुणे : एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह,रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत सुरेद्र गडलींग या पाच जणांना नक्षलवाद्यांशी सबंध असल्याच्या संशयातून बुधवारी अटक करण्यात आली होती. या पाचजणांना आता १४ जूनपर्यंत जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान यापैकी एक संशयित आरोपी असलेल्या सुरेद्र गडलींग याचा ब्लडप्रेशर वाढल्याने त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

bagdure

अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांचे माओवाद्यांशी कनेक्शन असून, सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली आहे. या सर्व संशयितांविरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचही ते म्हणाले. तर रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्या झाडाझाडतीत माओवाद्यांचे पैसे एल्गार परिषदेत वापरले गेल्याचं पुरावे मिळाल्याच कदम यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...