संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ आज राज्यभरात निघणार सन्मान महामोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरात सन्मान मोर्चाचं आंदोलन करण्यात येणार आहे.

पुण्यात सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून, लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठाननं केला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सांगलीमध्ये काल पोलिसांनी संचलन केलं. यामध्ये 850 पोलीस सहभागी झाले होते.